पारोळा तालुक्यातील अल्पवयीनाचा बालविवाह : तिसर्यांदा प्रसुतीनंतर प्रकार उघड
पतीसह सासू-सासर्यांविरोधात गुन्हा : पोलिसांनी दाखल केली फिर्याद
पारोळा (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : पारोळा तालुक्यातील एका गावातील सुमारे 17 वर्षीय अल्पवयीनाचा विवाह झाल्याचा प्रकार पीडीता तिसर्यांदा प्रसुत झाल्यानंतर उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत आरोपी पतीसह सासू-सासर्यांविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल केला.
असे आहे प्रकरण ?
16 वर्ष व नऊ महिने वय असलेल्या पीडीतेचे सुमारे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले असून तिला यापूर्वी एक मुलगा व मुलगी आहे तर तिसर्यांदा तिला प्रसुतीसाठी धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असता पीडीता प्रसुत झाली व तिने स्त्री जातीच्या मुलीला जन्म दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना सूचित करण्यात आल्यानंतर पोलिसांनी जवाब नोंदवला व प्रकरण पारोळा तालुक्यातील असल्याने कागदपत्रे गुन्हा दाखल झाल्यानंतर पारोळा पोलिसांकडे पाठवली. या प्रकरणी धुळे शहरच्या कॉन्स्टेबल वैशाली कांडेकर यांच्या फिर्यादीवरून पती, सासू व सासर्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहेत.


