जावळे गावात परदेशी-राजपूत समाजातील 52 गुणवंतांचा गुणगौरव
चाळीसगाव (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : चाळीसगाव येथील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाची वार्षीक आमसभा जावळे येथे दि. 6 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी विविध परीक्षांमध्ये यशोशिखर गाठलेल्या समाजाच्या गुणवंत विदयार्थी, विदयार्थीनींचा तसेच विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या समाजबांधवांचा प्रशस्तीपञ, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अशा एकुण 52 गुणवंतांचा हा गुण गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
सुरुवातीस मिनेश भगवान, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण व दिपप्रज्वलन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविकातुन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. कर्तारसिंग परदेशी यांनी उन्नती मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जावळे येथे सुरु असलेल्या मंगलकार्यालयाच्या बांधकामास समाजबांधवांनी आर्थिक मदत करुन सहकार्य करावे. असे आवाहन समाज बांधवांना केले. तसेच गुणंवत विदयार्थ्यांसह विविध क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजबांधवांना शुभेच्छाही दिल्या. विदयार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलल्याचे दिसुन आले.

सूत्रसंचलन संदीप परदेशी दिघी, विनोद परदेशी नागद, कैलास परदेशी दिघी या शिक्षक बांधवांनी केले. याप्रसंगी विजयसिंग थानसिंग परदेशी बहाळ या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी या लाडक्या मुलांनो तुम्ही आम्हा आधार नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार हे सुंदर गीत सुरेल आवाजात गायन केले.
परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ, कार्याध्यक्ष डॉ.कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, उपाध्यक्ष मथुराबाई भगवानसिंग लोदवाळ, खजिनदार डॉ. जयसिंग शामसिंग परदेशी, संचालक सुभाष मन्नुसिंग महाजन, अॅड. हिरालाल पुनमचंद परदेशी, भगवान रघुविरसिंग परदेशी, अशोक महादु परदेशी, संचालीका डॉ. सुशिला कर्तारसिंग परदेशी, सचिव निलेश जयसिंग परदेशी यांचेसह संचालक तसेच हभप. ज्ञानेश्वर माऊली सातगाव आदि मान्यवर उपस्थित होते.
सभेचे अहवाल वाचन संचालक सुभाष महाजन यांनी केले.
यावेळी डॉ. रविंद्र परदेशी वाघले, कुणाल परदेशी नागद, हभप. ज्ञानेश्वर माऊली सातगाव यांचेसह समाज बांधव विदयार्थी, विदयार्थीनी आदिंनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षिय मनोगतातुन बोलतांना संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ यांनी सांगीतले कि, आपल्या समाजाच्या मंगल कार्यालयासाठी जावळे येथील भगवान परदेशी, गोरख परदेशी यांचे कुटुंबाने ही जमीन विनामुल्य दिलेली आहे. याच जागेवर सध्या मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरु झालेले आहे. आता पुढील बांधकाम पुर्ण करण्यासाठी समाजबांधवांनी आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याचे समाजबांधवांना आवाहन केले. तसेच गौरव करण्यात आलेल्या गुणवंत विदयार्थी, विदयार्थीनी व समाजबांधवांच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. आभार संचालक अँड. हिरालाल परदेशी यांनी मानले.
यावेळी मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी आर्थिक मदतरुपी देणगी देणार्या समाज बांधवांसह महिलांचाही पदाधिकार्यांच्या हस्ते शाल,पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. व आभारही मानण्यात आले.
तसेच उन्नती मंडळाचे सचिव निलेश परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापुन पदाधिकार्यांमार्फत सत्कार करुन वाढदिवसाच्या उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
चाळीसगाव येथील साईराज आँर्केस्टाँचे संचालक विनोद परदेशी यांनी हॅपी बर्थ डे टु यु वाढदिवसानिमित्त सुरेल आवाजात सुंदर गित गायन करुन उपस्थितांना मंञमुग्ध केले. या कार्यक्रमास कन्नडचे माजी आमदार उदयसिंग राजपुत, नागदचे जि.प.च माजी सदस्य सरदारसिंग शिरा, डॉ. दिलीपसिंग राजपुत नागद, सिनेट सदस्य भगवानसिंग डोभाळ, आरवली फाऊंडेशनचे अध्यक्ष महिपालसिंग चांदा, कन्नडचे शिवसेना तालुका उपप्रमुख संजय गोठवाळ, भडगाव शेतकरी संघाचे संचालक रायचंद परदेशी, भगवान लोदवाळ जावळे, गोरख लोदवाळ जावळे, परदेशी, राजपुत, मिणा समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, तंटामुक्त समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद जोनवाळ, जिल्हा उपाध्यक्ष भगवान परदेशी, उपाध्यक्ष हरी परदेशी, सचीव विनोद महेर, कन्नड तालुकाध्यक्ष प्रकाश चांदा, पाचोरा तालुकाध्यक्ष इंदलसिंग गोठवाळ,, जामनेर तालुकाध्यक्ष अमोल कायठे, गोविंद लुकडे पळासखेडे, भडगाव सचिव किरण परदेशी, विजयसिंग गोमलाडु, रायचंद परदेशी वाडे,जगदिश राजपुत वाडे, मिथुन परदेशी भट्टगाव, रुमसिंग परदेशी घुसर्डी, पढावदचे मदन कोंडु परदेशी, रामचंद परदेशी डांभुर्णी, संपत परदेशी जावळे, विठ्ठल महेर पांगरा, भिमसिंग परदेशी बहाळ, सुनिल परदेशी जावळे,जयसिंग चन्नावत नागद, शाम परदेशी लोहटार तसेच समाजबांधव, महिला, सभासद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
जावळे येथील मुकेश मित्र मंडळ अणि गावकरी, सुनील राजपूत बाणगाव, अमोल राजपूत, अनिल राजपूत, राकेश राजपुत यांचेसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

