रावेर कृउबाच्या उपसभापतीपदी मनिषा पाटील बिनविरोध
रावेर (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनिषा सोपान पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
एकमेव अर्जाने बिनविरोध निवड
पंकज पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसभापती पदाची निवडणूक लागली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी.पाटील त्यांचे सहकारी महेंद्र गाढे, प्रदीप महाजन, बाजार समिती सचिव कमलेश पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी उपसभापती पदासाठी मनिषा साहेबराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

यावेळी कृषी उपन्न बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, संचालक डॉ.राजेंद्र पाटील, मंदार पाटील, राजू ठेकेदार, गणेश महाजन, योगीराज पाटील, पांडुरंग पाटील, रोहित अग्रवाल, जयेश कुयुटे, सविता दिनेश पाटील, पंकज राजीव पाटील, सैय्यद अजगर तिकडू, पितांबर पाटील, सिकंदर तडवी आदी बाजार समिती संचालक उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच सर्व संचालकांनी नवनिर्वाचित उपसभापती मनिषा पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सावदा मंडळ प्रभारी विजय महाजन, संजय महाजन, राजू सुवर्णे, अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती.

