गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भुसावळ विभागातील पीआरएस केंद्रांच्या वेळेत बदल


भुसावळ (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेद्वारा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी भुसावळ विभागातील सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली केंद्रांच्या कार्य वेळेत बदल करण्यात आला आहे. भुसावळ विभागातील सर्व पीआरएस आरक्षित तिकीट बुकिंग काउंटर सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.

त्यानंतर दुपारी दोन ते रात्री 10 वाजेपर्यंत पीआरएस केंद्रांवरील आरक्षण काउंटर बंद राहतील. प्रवाशांची सुविधा आणि आपत्कालीन गरजा लक्षात घेऊन पुरेशा संख्येने पीआरएस काउंटर आपत्कालीन कामकाजासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. 14 सप्टेंबर 2026 रोजी पीआरएस केंद्रांवर आरक्षणाशी संबंधित कामासाठी निर्धारित कार्य वेळेची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !