शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती घडवित विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये मूर्तीकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित शहरताील द वर्ल्ड स्कूलमध्ये शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला आणि कलात्मक कौशल्याला मुक्त वाव दिला.

कार्यशाळेस संस्थेच्या संचालिका सीएस रचना रोहित कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिकापेट्रीशिया सी. हैसेट यांचीही यावेळी उपस्थिती लाभली.

कार्यशाळेदरम्यान कला व हस्तकला शिक्षिका ज्योती आर.राठोड यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः मूर्ती साकारत या कलाप्रकाराचा अनुभव घेतला. विविध आकार व आकर्षक रूपांमध्ये विद्यार्थ्यांनी घडविलेल्या मूर्तींमधून त्यांची सर्जनशीलता आणि कलात्मक दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून आला.

पर्यावरणपूरक सणोत्सवाची जाणीव
केवळ मूर्ती घडविण्यापुरता मर्यादित न राहता या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शाडू मातीच्या मूर्तींचा वापर केल्यास पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम कमी करण्यास मदत होते, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सीएस रचना रोहित कोलते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, उत्सव साजरा करताना पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

मुख्याध्यापिका पेट्रीशिया सी.हैसेट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीरित्या झाली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कला व हस्तकला शिक्षिका ज्योती आर. राठोड, सर्व समन्वयक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्जनशीलतेसोबतच पर्यावरणाची जपणूक करण्याची शिकवण देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !