‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत काहूरखेडे शाळेचे सहा विद्यार्थी चमकले

तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड


भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : जिल्हा परिषद, जळगाव यांच्या वतीने विनोबा अ‍ॅपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शाळा, केंद्र, तालुका व जिल्हा अशा चारस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे, ता. भुसावळ येथील सहा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे या सहा विद्यार्थ्यांपैकी गायत्री अलकेश पाटील, श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील आणि चैताली विकास पाटील या तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने विनोबा अ‍ॅपच्या माध्यमातून स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा केंद्रस्तरावर घेण्यात आला. जिल्हा परिषद केंद्र शाळा वरणगाव येथे आयोजित केंद्रस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान व केंद्रप्रमुख राजेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

लेट द बेस्ट स्पेलर, स्पेल सक्सीड या ब्रीदवाक्यांना सार्थ ठरवत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदविला.

काहूरखेडे शाळेची दमदार कामगिरी
केंद्रस्तरीय स्पर्धेच्या अंतिम निकालात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

गट 1 (इयत्ता 1 ली व 2 री) मध्ये गायत्री अलकेश पाटील हिने प्रथम क्रमांक, तर हर्षद नीलेश हटकर याने तृतीय क्रमांक मिळवला.

गट 2 (इयत्ता 3 री व 4 थी) मध्ये श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील हिने प्रथम क्रमांक, तर आरुषी उमेश पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला.

गट 3 (इयत्ता 5 वी व 6 वी) मध्ये चैताली विकास पाटील हिने द्वितीय क्रमांक, तर किर्ती ज्ञानेश्वर पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला.

अशा प्रकारे काहूरखेडे शाळेच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.

इतर शाळांतील विद्यार्थ्यांचीही उल्लेखनीय कामगिरी

या स्पर्धेत इतर शाळांतील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली.

गट 1 :
प्रथम – गायत्री अलकेश पाटील – जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
द्वितीय – भावना दिपक बावस्कर – जि. प. प्रा. शा. अंजनसोंडे
तृतीय – हर्षद नीलेश हटकर – जि. प. प्रा. शा. काहूरखेडे

गट 2 :
प्रथम – श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील – जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
द्वितीय – आकांक्षा प्रमोद सुरवाडे – जि. प. प्रा. शा. हतनूर
तृतीय – आरुषी उमेश पाटील – जि. प. प्रा. शा. काहूरखेडे

गट 3 :
प्रथम – दिक्षा राजेंद्र धनगर – जि. प. प्रा. शा. टहाकळी
द्वितीय – चैताली विकास पाटील – जि. प. प्रा. शा. काहूरखेडे
तृतीय – किर्ती ज्ञानेश्वर पाटील – जि. प. प्रा. शा. काहूरखेडे

गट 4 :
प्रथम – ओम प्रवीण पाटील – जि. प. प्रा. शा. टहाकळी
द्वितीय – पार्थ राजेंद्र महाजन – जि. प. प्रा. शा. टहाकळी
तृतीय – पलक विशाल तायडे – जि. प. प्रा. शा. सिद्धेश्वर वरणगाव

केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार काहूरखेडे शाळेच्या गायत्री अलकेश पाटील, श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील आणि चैताली विकास पाटील या तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आयोजनासाठी मान्यवरांचे योगदान
स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून ए.के.इंगळे (जी.एस.विद्यालय, वरणगाव) व एच.एस.पाटील (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव) यांनी अचूक व पारदर्शक मूल्यमापन केले.

उषा तडवी यांनी वर्ग व्यवस्थापनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. भूषण देशमुख यांनी तांत्रिक सहाय्य केले. समाधान जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विलास सूर्यवंशी यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. ज्योती बेलसरे यांनी आकर्षक व सर्जनशील फलक लेखन व रेखाटन करून कार्यक्रमस्थळाची शोभा वाढवली. शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. विविध शाळांमधून आलेले मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच केंद्र शाळेतील सर्व सहकारी शिक्षकांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

स्पर्धेतील सर्व बालस्पर्धकांच्या मेहनतीचे व उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करण्यात आले. विशेषतः काहूरखेडे शाळेच्या सहा विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, पालकांचे व शाळेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !