मुक्ताईनगरच्या ओम गणेश महाजनची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पटकावले सुवर्णपदक


मुक्ताईनगर (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : मुक्ताईनगर शहरातील युवा खेळाडू ओम गणेश महाजन याने 19 व्या महाराष्ट्र राज्य ग्रॅपलिंग (कुस्ती) अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ओमने स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन करून विजय मिळवला.

राज्यस्तरीय व्यासपीठावर आपल्या खेळातील कौशल्य, सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर ओमने ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे मुक्ताईनगर शहराच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ओम गणेश महाजन याचे वडील फोटोग्राफी व्यवसाय करतात. प्रतिकूल परिस्थितीतही मुलाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला प्रोत्साहन देत त्यांनी त्याला सातत्याने पाठबळ दिले. अनेक कष्ट आणि मेहनतीनंतर ओमने मिळवलेल्या या सुवर्णपदकामुळे महाजन परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

ओमच्या यशाची माहिती समोर येताच मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांकडून ओमचे अभिनंदन करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय ग्रॅपलिंग, स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ओमने मुक्ताईनगरमधील नवोदित खेळाडूंसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशामुळे आगामी काळात तो जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !