डॉ.केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग जी.एन.एम. तृतीय वर्षाचा 97.29 टक्के निकाल : 33 विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ श्रेणी


जळगाव (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यकीय परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या जुलै 2025-26 जी.एन.एम. तृतीय वर्षाच्या परीक्षेत महाविद्यालयाचा 97.29 टक्के निकाल लागला आहे.या परीक्षेत महाविद्यालयातील तब्बल 33 विद्यार्थ्यांनी ‘अ+एक्सलंट’ श्रेणी, तर 3 विद्यार्थ्यांनी ‘अ’व्हेरीगुड श्रेणी प्राप्त केली.

परीक्षेत सुहानी सुनील लोखंडे हिने 84 टक्के गुणांसह विशेष प्राविण्य मिळवत अव्वल कामगिरी केली. सुरेखा सुरेश गावित हिने 80.8 टक्के, मोहिनी रामलाल पाटील हिने 80.6 टक्के आणि तानिश परवीन गोंगालेन हिने 80.4 टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. तनुश्री मनोहराव पोहाणे हिने 79.6 टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणी प्राप्त केली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य आणि शिक्षकवृंदाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.नर्सिंग क्षेत्रात कुशल, संवेदनशील आणि सक्षम मनुष्यबळ घडविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक विकासावर विशेष भर दिला जात आहे. उत्कृष्ट शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याचा पाया आहे, या विचाराला अधोरेखित करणारा हा निकाल ठरला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !