देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेला मुदतवाढ


भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी व प्रवाशांची सोय तसेच वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन देवळाली-दानापूर दरम्यान धावणार्‍या ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे सेवेची’ मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 01053 देवळाली-दानापूर अनारक्षित विशेष रेल्वे 12 ते 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे तर गाडी क्रमांक 01054 दानापूर-मनमाड अनारक्षित विशेष रेल्वेला 14 ते 21 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या विशेष रेल्वेच्या वेळापत्रक, थांबे व रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !