सावद्यात रंगणार 27 सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
केशवस्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजन
जळगाव (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचे हे दुसरे वर्ष असून महोत्सवात सहभागी होण्यासाठी 18 सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची मुदत आहे. भुलाबाई महोत्सवात सहभागी होण्यासाठी तीन गट आहे. पहिला लहान गट 3 ते 10 वर्षे, मोठा गट 11 ते 16 आणि तिसरा खुला गट 17 वर्षांपासून पुढील मुली, महिलांना सहभाग घेतला येणार आहे. यात स्पर्धेकांना स्वतःच गायन, वादन, टिपर्यांवर नृत्य करायचे आहे, या सादरीकरणासाठी 5 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.
27 रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेसाठी प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी 18 सप्टेंबर पर्यंत 9960577698 या क्रमांकावर किंवा सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे संपर्क साधून नोंदणी करणे गरजेचे आहे.
या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी गौरी जोशी यांच्याशी 9960577698 या क्रमांकावर संपर्क साधावा. या महोत्सवात शाळा, महाविद्यालय, महिला मंडळ, भजनी मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

