भुसावळातील शिव कॉलनीत महिलांतर्फे सामूहिक हरतालिका पूजन


भुसावळ (सोमवार 14 सप्टेंबर 2026) : शहरातील शिव कॉलनी परिसरातील महिलांनी सोमवार, 14 रोजी सकाळी साडेसात वाजता एकत्र येत सामूहिक हरतालिका पूजन केले. या धार्मिक उत्सवाप्रसंगी पुरोहित मयूर जोशी यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोपचार करून भाविक महिलांकडून पूजा संपन्न करून घेतली.

या सामूहिक पूजनाच्या वेळी नगरसेविका डॉ.छाया देशमुख, उषा रहाने, प्रिया पाटिल, अश्विनी पाटील, भारती धंपाल, उषा धंपाल, जागृती पाटील, प्रीती महाजन, मीना चौधरी, दीपाली पाटील यांच्यासह महिला भाविक उपस्थित होत्या. कॉलनीतील बहुसंख्येने उपस्थित महिलांनी या पूजनात सहभाग घेत पारंपरिक पद्धतीने हरतालिकेची विधीवत पूजा करीत उपवास केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !