एरंडोलसह मुक्ताईनगर व जामनेर बसस्थानकात मंगळसूत्र चोरी : अहमदनगर जिल्ह्यातील भामट्याला बेड्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चार लाख 59 हजार रुपयांचे तीन मंगळसूत्र जप्त
जळगाव (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याच्या चैन चोरी करणार्या अट्टल चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीने एरंडोलसह मुक्ताईनगर व जामनेरात मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली देत 27 ग्रॅम वजनाचे व सुमारे चार लाख 59 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून दिले. ही कारवाई जळगावातील मुख्य बसस्थानकात करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
12 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील मुख्य बसस्थानकात गस्तीवर असताना सागर दादासाहेब जाधव (31, रा.खर्डे, ता.पाथर्डी, अहमदनगर) यास ताब्यात घेण्यात आले व त्याने गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून 27 ग्रॅम वजनाचे व चार लाख 59 हजार रुपये किंमतीचे तीन मंगळसूत्र जप्त करण्यात आले. तपासात एरंडोल, जामनेर व पाचोरा पोलीस ठाणे हद्दीतल तीन गुन्ह्यांची उकल झाली. आरोपीला तपासासाठी एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व संदीप गावीत, उपअधीक्षक विनायक कोे, उपअधीक्षक बापू रोहोम, उपअधीक्षक नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार हरीलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाणे, राहुल कोळी, विकास गायकवाड, गोपाळ पाटील, चालक प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने केली.
