यावल शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात ‘श्रीं’ ची स्थापना
यावल (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : यावल शहरासह तालुक्यात सोमवारी मोठ्या जल्लोषात विघ्नहर्त्याची स्थापना करण्यात आली. शहरात 21 तर ग्रामीण भागात हद्दीत 72 अशा एकूण 93 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत श्रींची उत्साहात स्थापना केली.
साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी
केळी खोडं, दुर्वा विक्रीकरीता शहरात विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने सकाळपासून भाविकांची गर्दी वाढली होती तर यंदा मातीच्या मूर्तीला मागणी राहिली तर अनेक ठिकाणी रात्रीपर्यंत सजावटीचेे काम सुरूच होते. यात प्रामुख्याने वाणी गल्लीत चितोडे वाणी गणेश मंडळाकडून यंदा ऋृषीकेश येथील झुलता पुल, गोमुखाचा देखावा साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.



मंडळाकडून भव्य कृत्रिम तलाव उभारून त्यावर झुलता पुल, लहान धबधबा, मोमुख उभारण्यात येत आहे. शहर व तालुक्यात दिवसभर विविध वाहनाव्दारे मंडळाचे कार्यकर्ते जल्लोषात श्रींची मूर्ती नेताना दिसून आले. घरो-घरी नागरीकांकडून देखील श्रींची स्थापना करण्यात आली. यावल पोलीस ठाण्यातही अधिकारी व कर्मचारी बांधवांकडून श्रींची स्थापना करण्यात आली.
