भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश स्कूलमध्ये सायन्स क्वीझ स्पर्धा


भुसावळ (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये बुधवार, 16 रोजी मराठी साहित्यिक स्व.बाबासाहेब के. नारखेडे यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त सायन्स क्वीझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑ.जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.

28 विद्यार्थ्यांचा सहभाग
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाहाटा कॉलेजच्या प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे व कांचन राणे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच माल्यापर्ण करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल, द वर्ल्ड स्कुल, श्रीमती प.क.कोटेचा, के.नारखेडे विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, पोदार स्कुल तसेच एन.के.नारखेडे स्कुल मिळून एकूण 28 विद्यार्थ्यांनी सायन्स क्वीझ स्पर्धेत सहभाग घेतला.शाळेतील शिक्षिका रुही बासीत, रत्नमाला सोनवणे, जयश्री नेहेते, रश्मी निकुंभ यांनी मार्गदर्शन केले.




स्पर्धेत यांनी मिळवले यश
प्रथम- पोदार इंटरनॅशनल स्कुल आणि एन.के.नारखेडे इंग्लिश मिडियम स्कुल यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक ताप्ती स्कुल तसेच तृतीय क्रमांक वर्ल्ड स्कुल यांना मिळाला. विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा हा स्व.बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त 21 सप्टेंबर 2026 रोजी एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये होईल. सूत्रसंचालन गजाला बासीत यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !