‘भुसावळच्या राजा’साठी शिवभूमी प्रिंटींगने साकारले भव्य ‘शिवद्वार’
भुसावळ (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : शिवमुद्रा प्रतिष्ठान ‘भुसावळचा राजा’ गणेश मंडळाच्या भव्य देखाव्याला साजेसे आकर्षक ‘शिवद्वार’ यंदा शिवभूमी प्रिंटगच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे.
या भव्य प्रवेशद्वाराची संकल्पना व निर्मिती शिवभूमी प्रिंटगचे संचालक लोकेश वाणी यांची आहे. याकामी त्यांना दीपक थनवाल, सौरभ शर्मा, राधे ठाकूर, लकी बेदरकर, सर्वेश राणे, कुणाल तायडे, घनश्याम भारंबे, प्रफुल्ल राणे, निखील जंजाळकर व संपूर्ण सहकारी टीमची मोलाची साथ लाभली.



विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी
या कामासाठी मंडळाचे अध्यक्ष उमेश इंगळे, उपाध्यक्ष प्रथमेश पवार व खजिनदार प्रजय चौधरी यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उत्तम सहकार्य लाभले. एवढी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी शिवमुद्रा प्रतिष्ठानने आमच्यावर विश्वासाने सोपविल्याबद्दल शिवभूमी प्रिंटगच्या वतीने शिवमुद्रा प्रतिष्ठानचे आम्ही आभार मानतो. हा विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी असून, तो सार्थ ठरविण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमने मनापासून मेहनत घेतली, असे लोकेश वाणी यांनी सांगितले. मंडळाची संकल्पना, शिवभूमी प्रिंटींगची कल्पकता आणि संपूर्ण टीमची मेहनत यामुळे हे भव्य ‘शिवद्वार’ भुसावळसह तालुक्यातील भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
