30 सप्टेंबरपर्यंत शेतकर्‍यांनी आपापले पीक पेरे प्राधान्याने नोंदवावे : रावेर प्रभारी तहसीलदार संजय तायडे


रावेर (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : रावेर तालुक्यात एकूण 66 हजार 700 गट असून त्यापैकी आतापर्यंत फक्त 14 हजार 483 शेतकर्‍यांनी आतापर्यंत ऑनलाईन पीक पेरे नोंदवलेले आहेत. शासनाने या वर्षापासून पीक पाहणी सहाय्यक नेमलेले आहेत. प्रत्येक गावातील शेतकर्‍यांनी आपापल्या गावात असलेला पीक पाहणी सहाय्यक याच्या मदतीने आपले पीक पेरे नोंदवून घ्यावे 30 सप्टेंबरपर्यंत शेतकर्‍यांनी आपापले पीक पेरे नोंदवण्याची मुदत असल्याचे रावेरचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी कळवले आहे.

तरय योजनांचाही लाभ मिळणार नाही
प्रभारी तहसीलदार तायडे यांच्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरनंतर पीक पेरे नोंदवले जाणार नाहीत आणि पीक पेरे नसले तर अशा शेतकर्‍यांना शासकीय अनुदान, मदत, विमा, किंवा इतर योजनांचा लाभ मिळणार नाही. 30 सप्टेंबरपर्यंत शेतकर्‍यांनी आपापल्या गावातील नेमणूक केलेल्या पीक पाहणी सहाय्यकामार्फत त्यांच्या मदतीने पीक पेरे करून घ्यावे तसेच शेतकरी सुद्धा आपल्या पिकांची पद्वारे पीक पाहणी करू शकतात. सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या शेताची पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहनही तायडे यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !