अमळनेर तालुक्यातील 27 वर्षीय विवाहितेचा विनयभंग


अमळनेर (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील एका 27 वर्षीय महिलेच्या घरात घुसून एकाने विनयभंग केला. ही घटना 13 रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. देवगाव-देवळीतील 27 वर्षीय महिला घरात एकटी असताना गावातील श्याम धर्मा महाजन (30) हा घरात घुसला आणि त्याने महिलेशी अंगलगट करून विनयभंग केला.

महिलेने प्रतिकार केला व आरडा-ओरड केल्यानंतर शेजारीला महिला घरात आल्यानंतर संशयीत पसार झाला. महिलेने कुटूंबात प्रकार सांगितल्यानंतर संशयीताला जाब विचारला असता संशयीताने महिलेलाच मारहाण करीत दुखापत केली. महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !