जळगावातील चित्रा चौकासमोरून भामट्यांनी दुचाकी लांबवली
जळगाव (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : जळगाव शहरातील जिल्हापेठ परिसरातील चित्रा चौकासमोरील रोडवर उभी केलेली 35 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची अॅक्टिव्हा 4 जी दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी सतीश वसंतराव शर्मा (76, रा. प्लॉट नं. 170, जिल्हापेठ, चित्रा चौक, जळगाव) यांनी आपली होंडा कंपनीची काळ्या रंगाची अॅक्टिव्हा 4 जी दुचाकी (एम.एच.19 डी.बी.1317) ही 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान जिल्हापेठ चित्रा चौकासमोरील रोडवर उभी केली असता चोरट्यांनी संधी साधली. वाढत्या चोर्यांनी दुचाकी मालकधास्तावले आहेत.



