भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात
भुसावळ (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी दिवसाचे महत्त्व चिन्मयी फेगडेने सांगितले. नंतर चमक- दमक हे भजन यज्ञश्री फेगडे व ग्रुपने सादर केले.
कबीर के दोहे इयत्ता दहावी अ ची विद्यार्थिनी संजीवनी चौधरी हिने म्हटले. इयत्ता दहावी फ च्या विद्यार्थिनींनी सुंदर नाटिका तसेच इयत्ता बारावीच्या आकांक्षा जाधव व ग्रुप यांनी नृत्य सादर केले.



यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे उपप्रधानाचार्य एस.पी.पाठक, बी.बी.जोगी उपस्थित होते. उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक यांनी आपले मनोगत हिंदी भाषेतून व्यक्त केले. यशस्वीतेसाठी पी.एस.पाटील टीचर व जी.व्ही.पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूर्वा बोरनारे व श्रद्धा पाटीलने केले.
