रावेर तालुक्यातील 308 उपद्रवींवर कारवाईचे प्रस्ताव सादर


रावेर (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल 308 उपद्रवींना पाच दिवसांच्या कालावधीसाठी शहर व तालुक्यात बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हा विशेष प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

पाच दिवस होणार कारवाई
रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध कायदेशीर कलमांन्वये 308 जणांना शहर व तालुका बंदीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार 22 ते 27 पर्यंत उपद्रवींना बंदी असणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !