कोसगावात किरकोळ वादातून 27 वर्षीय महिलेचा विनयभंग
पती व सासर्यालाही मारहाण : एकाविरोधात गुन्हा दाखल
यावल (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील कोसगाव येथे किरकोळ वादाच्या कारणावरून 27 वर्षीय महिलेला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली व विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकाविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले कोसगावात ?
कोसगाव, ता.यावल येथे किरकोळ कारणावरून वाद घालत गावातील एका 27 वर्षीय महिलेला तुषार युवराज सपकाळे याने शिविगाळ करून मारहाण केली तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केल्याचा आरोप आहे. यावेळी महिलेच्या पतीसह सासर्यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.



या घटनेप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहेत.
