सोशल मिडीयातून जुळले सुत : लग्नाचे वचन देत अमरावतीच्या 20 वर्षीय तरुणीवर भुसावळात अग्निविराने केला अत्याचार


भुसावळ (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : सोशल मिडीयातील इन्स्टाग्राम वेबसाईटवरून ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील 20 वर्षीय तरुणीला भुसावळात भेटायला बोलावून तिच्यावर स्टेशनजवळील एका लॉजमध्ये बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणीने जालना जिल्ह्यातील रहिवासी व अग्निवीर असलेल्या 24 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

असे आहे प्रकरण
अमरावती जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असलेली 20 वर्षीय तरुणी आईसोबत वास्तव्यास असून अमरावतीमध्ये आयटीआयचे शिक्षण घेते. सोशल मिडीया वापरताना इन्स्टाग्रामवरून तिची संशयीत तरुण ऋषीकेश लक्ष्मणराव वाघ (24, धोंडखेडा, ता.भोकरदन, ता.जालना) सोबत ओळख झाली व दोघांचे नंबर एकमेकांकडे आल्यानंतर बोलणेही वाढले. सततच्या संपर्कानंतर दोघांमध्ये प्रेम निर्माण झाल्यानंतर अग्निवीर असलेल्या तरुणाने भेटीसाठी तरुणीला भुसावळात येण्याचे निमंत्रण दिले.

भुसावळात केला अत्याचार
26 ऑगस्ट 2025 रोजी तरुणीसोबत भेटीची वेळ निश्चित केल्यानंतर तरुणी अमरावती येथून भुसावळात रेल्वेने दुपारी तीन वाजता आली व याचवेळी संशयीत तरुणाने रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये (नाव माहित नाही) रूम बुक केल्यानंतर दोघांची येथेच भेट झाली. दोघांमध्ये झालेल्या संवादानंतर तरुणाने तरुणीसोबत लग्न करण्याचे वचन दिले. यावेळी तरुणाने शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केली मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर पुढील वर्षी एप्रिलमध्ये मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगत अधिक जवळीक करीत इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. त्याचदिवशी तरुणी सायंकाळी साडेसात वाजता बसने अमरावतीला निघून आली.

तरुणाचा लग्नास नकार
तरुणीच्या तक्रारीनुसार, तरुणासोबत वाद झाल्यानंतर 10 जानेवारी 2026 नंतर बोलणे बंद झाले व 28 फेब्रुवारी 2026 तरुणाने कॉल करून लग्न करू शकत नसल्याचे कारण सांगितल्याने तरुणीला मोठा धक्का बसला. संशयीत ऋषीकेशला तसेच त्याच्या आई-वडीलांना अनेकदा कॉल केले मात्र संपर्क न झाल्याने मार्च महिन्यात आसेगाव-पूर्णा पोलीस ठाण्यात आईसोबत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर त्यावेळी ऋषीकेशचे वडील लक्ष्मणराव व आई पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी समजूत घालून समझोता केला व ऋषीकेश घरी आल्यानंतर लग्नाचे पाहू, असे सांगितल्याने त्यावेळी तरुणीने तक्रार दिली नाही मात्र त्यानंतरही तरुणाने लग्नाचे आश्वासन न पाळल्याने व तो लग्न करणार नसल्याची खात्री झाल्याने तरुणीने भुसावळ बाजारपेठ पोलिसात शुक्रवारी तक्रार दिल्यावरून आरोपी ऋषीकेश लक्ष्मणराव वाघ विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद सय्यद करीत आहेत. संशयीत अग्निवीर असून त्यास अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !