योगातून आरोग्य अन् स्नेहातून नात्यांची सुंदर वीण !

रावेरात आरोग्यम् योगा क्लासेसचे स्नेहसंमेलन उत्साहात


रावेर (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : आरोग्यदायी जीवन शैलीसोबतच प्रेम, आपुलकी, मैत्री आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणारे आरोग्यम् योगा क्लासेसचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात झाले.

योगाभ्यासाच्या माध्यमातून एकमेकींशी जोडलेल्या महिला सदस्यांनी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही निवांत आणि आनंदाचे क्षण अनुभवले. हास्य-विनोद, मनमोकळ्या गप्पा आणि आपुलकीच्या संवादामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भारून गेले होते. उपस्थित महिलांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि उत्साह हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

यांची होती उपस्थिती
या स्नेहसंमेलनाला योगिनी अर्चना पाटील, निता विजयवर्गीय, ज्योती महाजन, कविता पाटील, ज्योती सोळंकी, किरण महाजन, मेघा कासार, प्रियंका महाजन, सविता महाजन, स्नेहा बोधकर, रुपाली सोनार, वर्षा भावसार, मनीषा चौधरी, दीपाली चौधरी, शालिनी महाजन, रंजना बोधकर, कल्याणी पाटील, ललिता महाजन, सुनीता पाटील, ममता महाजन यांची उपस्थिती होती. प्रभावी सूत्रसंचालन किरण महाजन यांनी केले. स्नेहसंमेलनाचे नियोजन आरोग्यम् योगा क्लासेसच्या योगशिक्षिका सविता सुरज चौधरी यांनी केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !