भुसावळात 55 वर्षीय अनोळखीचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

घातपात की नैसर्गिक कारणाने मृत्यू ? शहरात चचार्र्ंना उधाण


भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : शहरातील रानातील महादेव मंदिराजवळील नाल्याच्या भागात 55 वर्षीय अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचा प्रकार रविवारी समोर आला. बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वी अनोळखीचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अनोळखीचा घातपाताने की नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला ? याबाबत तपास सुरू आहे.

दुर्गंधी सुटल्याने घटना समोर
घटनास्थळी शरीराच्या छातीपासून खालील भागाचा सांगाडा शिल्लक असल्याने मयत पुरूष की स्त्री हेदेखील सांगणे पोलिसांना अशक्य झाले. जळगाव येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून शवविच्छेदनानंतर मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. विशेष म्हणजे मृताची ओळख पटेल, अशी एकही खून घटनास्थळी आढळली नाही त्यामुळे मृताची सर्वात आधी ओळख पटवण्याचे आव्हान बाजारपेठ पोलिसांपुढे आहे. घटनास्थळी बाजारपेठ हवालदार जयेंद्र पगारे व सहकार्‍यांनी जावून पंचनामा करीत वरिष्ठांना माहिती दिली. मयत इसमाचा घातपाती मृत्यू झाला की अन्य कारणाने मृत्यू झाला? याबाबत अधिक स्पष्टता शवविच्छेदन अहवालाअंती येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !