भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन माधवराव पाटील
रावेर (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रावेर येथील नितीन माधवराव पाटील यांची निवड करण्यात आली. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण शशिकांत चौधरी यांनी ही निवड जाहीर केली. नितीन पाटील यांच्या निवडीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल जावळे, आमदार नंदू महाजन तसेच भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र प्रदेश सदस्य सुरेश धनके, नगराध्यक्ष संगीता महाजन, सभापती प्रल्हाद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, डॉ.संदीप पाटील नगरसेवक पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष रवी पाटील, सूर्यकांत देशमुख, सी.एस.पाटील, खजिनदार राजन लासुरकर, जिल्हा चिटणीस विजय महाजन गटनेते अमोल पाटील आदींनी नितीन पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



