जेन झी, समाज आणि पालकांमध्ये सर्वार्थाने समन्वय हवा
भुसावळातील जय गणेश फाउंडेशनच्या चर्चासत्रातील सूर
भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : जेन झी, समाज आणि पालक या सर्वांमध्ये योग्य समन्वय असेल तर वयोगटातील वैचारिक असमानता दिसणार नाही, असे मत जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवातील ‘जेन झी टू जेन अल्फा विथ गणपती बाप्पा’ या चर्चासत्रातून मांडला गेला.
यांचा चर्चेत सहभाग
जगभरातील विविध देशातील झालेली आंदोलने, दिल्लीत जंतरमंतरवर झालेले आंदोलन तसेच सर्वसामान्यपणे देशात वावरणारी जेन झी व जेन अल्फा पिढी यांच्या एकूण वर्तणूक, त्यावर पालक तसेच समाजातील विविध घटकांनी घ्यायची भूमिका आदी विषयावर मान्यवरांनी चर्चा केली. चर्चेत विरेंद्र पाटील (नाट्य), प्रा.डॉ.सुनील नेवे (शिक्षण), सुयश न्याती (रोटरी क्लब अध्यक्ष), सोनू मांडे (शिक्षण संस्था), पत्रकार शेखर पाटील, समीर पाटील (रेल्वे कंत्राटदार) आदी विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले होते. प्रा.गिरीष कुलकर्णी यांनी खुमासदार व अभ्यासपूर्ण सूत्रसंचलन करतांना देश तसेच विदेशातील जेन झी वर प्रश्न विचारून वक्त्यांना बोलते केले. चर्चेत प्रेक्षकांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित करून सहभाग घेतला.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
‘जेन झी टू जेन अल्फा विथ गणपती बाप्पा’ या आगळ्या-वेगळ्या व संवेदनशील चर्चासत्राच्या आयोजन व यशस्वीततेसाठी जय गणेश फाउंडेशनच्या संस्थापक उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आघाडीचे अध्यक्ष हर्षल वानखेडे, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष विशाल आहुजा, पार्थ चौधरी, ओम चौधरी, नचिकेत यावलकर, सुमित यावलकर, अभिषेक वाणी, सुमित आहुजा, रवी जोनवाल, योगेश बुंदेले, सुजय पाटील, नक्षत्र कोलते, सिद्धांत राठोड, समीर पिंजारी आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.




