भुसावळात सुवर्णकार समाज मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त निबंध लेखन स्पर्धा
भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : नवअहिरे सुवर्णकार समाज मंडळ, भुसावळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शहरातील सुवर्णकार समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सुवर्णकार बंधू-भगिनींसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नाही.
तीन गटात होणार स्पर्धा
स्पर्धेचे तीन गट करण्यात आले आहेत. गट पहिला इयत्ता पाचवी ते सातवी, गट दुसरा इयत्ता आठवी ते बारावी आणि गट तिसरा सर्वांसाठी खुला असून वयाची अट नाही. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 501, 301 आणि 201 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
24 सप्टेंबरपर्यंत निबंध जमा करणे आवश्यक
स्पर्धकांनी आपला निबंध 24 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत दिलेल्या ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त होणारे निबंध स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत. निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला असावा. प्रत्येक गटासाठी निर्धारित विषयावरच निबंध लिहिणे बंधनकारक आहे.
विविध विषयांवर निबंध स्पर्धा
गट पहिल्यासाठी ‘संत शिरोमणी श्री नरहरी महाराज’, ‘आजच्या विद्यार्थ्यांची दिनचर्या’ आणि ‘अपयश ही यशाची पहिली पायरी’ हे विषय देण्यात आले आहेत.
गट दुसर्यासाठी ‘परीक्षांचा वाढता ताण’, ‘समाज माध्यमांवरील तरुणांचा प्रभाव’ आणि ‘तरुणांचा भारत’ हे विषय आहेत.
गट खुल्यासाठी ‘ऑनलाईन शॉपिंगचे फायदे आणि तोटे’, ‘मोबाईलचे घरातील स्थान’ आणि ‘संस्कारित कुटुंब’ हे विषय देण्यात आले आहेत.
हस्ताक्षर व मांडणीला महत्त्व
निबंध लेखनासाठी कागदाच्या एकाच बाजूचा वापर करावा. निबंधात शुद्धलेखन, विषयाची मांडणी, भाषा, व्याकरण, हस्ताक्षर इत्यादी बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. निबंधावर स्पर्धकाचे नाव, संपर्क क्रमांक, शाळेचे अथवा महाविद्यालयाचे नाव लिहावे. स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करून स्वतंत्र कागद निबंधासोबत जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निबंध श्री.संतोष (बंडुभाऊ) अशोकराव भामरे (सोनार), गंगाराम प्लॉट, जामनेर रोड, भुसावळ येथे जमा करावयाचा आहे.
स्पर्धेची संकल्पना नारायण घोडके व राजेंद्र पारोळेकर यांची असून प्रकल्प प्रमुख कमलेश निकुंभ व प्रा.डॉ. शामकुमार दुसाने, संयोजक प्रवीण मोरे आहेत. या उपक्रमाचे आयोजन नवअहिर सुवर्णकार समाज मंडळ, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.




