यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरात विविध स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव
यावल (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : शहरातील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व.वासुदेव राजाराम वाणी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त विद्यालयातील पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा गटनिहाय घेण्यात आल्या. त्यात क्रीडा, निबंध, वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला व रंगभरण स्पर्धेचा समावेश होता. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पी.एस.सोनवणे यांनी शाळेला व्यासपीठ (डेक्स) सप्रेम भेट दिला. मान्यवरांचे हस्ते त्याचे शाळेला प्रत्यार्पण करण्यात आले. कै.वाणी सरांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त सुंदरशाळा स्वच्छ शाळा व प्लॅस्टीक पिशव्या मुक्त शाळा असा संकल्प करण्यात आला. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना संस्थाध्यक्ष महेश वाणी, प्रमुख पाहुणे वसंतराव सीताराम पाटील व पी.एस.सोनवणे यांच्याहस्ते बक्षीस देवून गौरवण्यात आले.
मान्यवरांनी आपल्या भाषणात आप्पासाहेब कै.व्ही.आर.वाणी यांच्या कार्याला उजाळा दिला तसेच त्यांनी स्पर्धांमधे विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन सुनील देशमुख तर आभार नितीन बारी यांनी मानले. मुख्याध्यापक सुनील माळी, मुख्याध्यापक अतुल गर्गे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.




