ग्राहकांना मोठा दिलासा : बँक कर्मचार्‍यांचा 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा संप स्थगित


नवी दिल्ली (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत प्रस्तावित करण्यात आलेला बँक कर्मचार्‍यांचा तीन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित करण्यात आला आहे. संपाच्या आदल्या दिवशी इंडियन बँक्स असोसिएशन (खइ-) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारी 28 सप्टेंबरपासून बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता तूर्तास टळली आहे.

बँक कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी णऋइण कडून 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, संप सुरू होण्याच्या काही तास आधी खइ- आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. संप स्थगित झाला असला तरी सर्व मागण्यांवर अंतिम तोडगा निघाला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही त्यामुळे पुढील चर्चांकडे बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही प्रमुख मागणी
बँक कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याचा मुद्दा आहे. याशिवाय पेन्शन लाभांमध्ये सुधारणा, सर्व पेन्शनधारकांसाठी समान महागाई भत्ता धोरण आणि छझड अंतर्गत कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय देण्याच्या मागण्यांचाही समावेश आहे.

कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू आहे. त्यामुळे बँक कर्मचार्‍यांसाठीही अशीच व्यवस्था लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न
सप्टेंबरमधील चौथा शनिवार असल्याने बँका बंद होत्या. त्यानंतर प्रस्तावित तीन दिवसांच्या संपामुळे सलग अनेक दिवस बँकिंग व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता होती. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी काही ठिकाणी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. आता संप स्थगित झाल्याने चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा-काढणे आणि अन्य बँकिंग व्यवहारांवरील संभाव्य परिणाम टळला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, काही जुन्या खासगी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांवर प्रस्तावित संपाचा परिणाम होण्याची शक्यता होती.

सरकारकडून चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन
दरम्यान, वित्त मंत्रालयाकडून बँक कर्मचार्‍यांनी संपाचा मार्ग न स्वीकारता चर्चेतून प्रश्न सोडवावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे खइ- आणि णऋइण यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले होते.

सध्या तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला असला तरी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर पुढील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे बँक कर्मचारी तसेच ग्राहकांचे लक्ष आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !