भुसावळ-दादर विशेष रेल्वेसेवेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : भुसावळ आणि दादर दरम्यान विशेष भाड्याने धावणार्या विशेष रेल्वेच्या फेर्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नोव्हेंबरपर्यंत गाडीला मुदतवाढ
गाडी क्रमांक 09049 दादर-भुसावळ साप्ताहिक विशेष गाडी 25 सप्टेंबरऐवजी आता 27 नोव्हेंबरपर्यंत 2026 तर गाडी क्रमांक 09050 भुसावळ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे 25 सप्टेंबर 2026 ऐवजी 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत गाडीचा विस्तार करण्यात आला. गाडी क्रमांक 09050 भुसावळ-दादर साप्ताहिक विशेषच्या विस्तारित फेर्यांचे आरक्षण 30 सप्टेंबर 2026 पासून सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. वरील विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळा, थांबे आणि डब्यांच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
