लोक चित्रकला सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे : भुसावळात सतीश वर्मा


भुसावळ (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : लोक चित्रकला सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत येथे डॉ. सतीश वर्मा यांनी व्यक्त केले. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर , सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या भुसावळात वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ब्राह्मण संघात 1 ते 5 दरम्यान सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी रागिणी संगीत कला महाविद्यालय बर्‍हाणपूरचे डॉ.वर्मा यांनी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश बडवेकर यांनी मार्गदर्शन केले. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरचे कार्यक्रम अधिकारी विवेक श्रीरामे, ब्राह्मण रंगाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, डॉ.सतीश वर्मा, चित्रकार रमाकांत भालेराव यांच्याहस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थानिक चित्रकार रमाकांत भालेराव यांनी चित्रकला व त्याचे महत्त्वाचे बिंदू आणि आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सर्व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजश्री देशमुख तर आभार रमाकांत भालेराव यांनी मानले.पाच दिवस चालणार्‍या या वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिरामध्ये स्थानिक चित्रकार रमाकांत भालेराव हे वारली चित्रकला संदर्भात प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणार्थींमध्ये सर्व वयोगटातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. ब्राह्मण संघाच्या सभागृहात हे शिबिर संध्याकाळी पाच ते सहा या वेळात सुरू असल्याचे आयोजक कळवतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !