भुसावळात युवती संमेलनाच्या पोस्टरचे अनावरण


भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शहरात 9 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार्‍या युवती संमेलनाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी स्वागत समितीच्या उपअध्यक्षा कविता कोठारी, स्वागत समितीच्या सदस्या कुमोदिनी इंगळे, अभाविप विभाग संयोजक गायत्री पाटील, शहर अध्यक्षा प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.डॉ.सपना जंगले, कार्यक्रम प्रमुख प्रेरणा कदम, योजना कुरकुरे व अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध विषयांवर साधणार संवाद
या युवती संमेलनाच्या माध्यमातून युवतींना विविध सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संमेलनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे मोठ्या संख्येने युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !