यावल शहरातील सरस्वती विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन


यावल (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : शहरातील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन झाले. 34 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत आणि विकसीत भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष’ हा होता.

तीन स्तरावर प्रदर्शन
प्रदर्शनासाठी उपविषय कृत्रिम बुद्धिमत्ता उत्तम जीवनासाठी, हरित ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धन, गणितीय प्रतिकृतीकरण आणि संगणकीय विचारसरणी, आरोग्य, स्वच्छता आणि स्वच्छताविषयक सुविधा, देशी/स्वदेशी कृषी पद्धती, ग्रामीण परिवर्तनासाठी विज्ञान, आपत्ती व्यवस्थापन होते.

विज्ञान प्रदर्शन सहावी-आठवी तसेच नववी-दहावी व माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर या पद्धतीने आयोजित करण्यात आले. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना वरील उपविषयांपैकी विषय निवडून वैज्ञानिक दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण कल्पना, समस्या-निराकरणाची क्षमता आणि समाजोपयोगिता लक्षात घेऊन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रयत्न केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सर्व उपकरणांची माहिती मिळवली.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर होते. एन.डी.भारुडे, एस.बी.चंदनकार, ए.एस.सूर्यवंशी, दीपक पाटील, दीपक जोशी, बी.पी.वैद्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार सुभाष चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी अमोल सुसर, सूर्यवंशी व इतर शिक्षक-शिक्षक कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

यांनी मिळवले यश
विज्ञान प्रदर्शनात मोठ्या गटात प्रथम क्रमांक श्रद्धा भोईटे, द्वितीय क्रमांक गार्गी पाटील, तृतीय क्रमांक ईशान पाटील तर लहान गटात प्रथम क्रमांक दुर्गेश चौधरी, द्वितीय क्रमांक पूर्वेश झुरकाळे, तृतीय क्रमांक मयुरी गायकवाडने पटकावला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !