भुसावळात भाजपातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींना जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहरातर्फे शासकीय विश्रामगृहात अभिवादन करण्यात आले. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांचे, तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेच्या आदर्शांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमास भुसावळ नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, जिल्हा सचिव प्रविण इखनकर, गिरीश महाजन, भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, नगरसेवक पिंटू कोठारी, बबलू बर्हाटे, निकी बत्रा, पिंटू ठाकूर, विशाल नाटकर, अर्चना सातदिवे, प्राची पाटील, शोभा इंगळे, संतोष चौधरी, आसिफ खान, आशिष पटेल, राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, रमेश मकासरे, राजेंद्र नाटकर, मनोज बियाणी, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, गुणवंत बोरोले, श्रेयस इंगळे, निलेश कोलते, राहुल तायडे, शहर सरचिटणीस सागर चौधरी, जयंत माहूरकर, अलका शेळके, शंकर शेळके, विलास सातदिवे, नंदू बडगुजर, अमित आसोदेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


