लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया दरम्यान उत्सव विशेष गाड्या धावणार
भुसावळ (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेने आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया दरम्यान उत्सव विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्या (सहा सेवा)
गाडी क्रमांक 08610 साप्ताहिक विशेष गाडी 13 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.55 वाजता सुटेल आणि हटिया येथे तिसर्या दिवशी दुपारी साडेचार वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 08609 साप्ताहिक विशेष गाडी 12 ते 26 ऑक्टोबदरम्यान दर सोमवारी हटिया येथून 4.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 9.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, बानो, गोबिंदपुर रोड आणि बालसीरिंग स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकूलित प्रथम / द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय, सात वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल.


