जळगावातील काकेवाडी परिसरात घरफोडी
जळगाव (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : शहरातील श्रीकृष्ण मंदिराजवळील काकेवाडी परिसरात 74 वर्षीय शेतकर्याच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून रोख रकमेसह मोबाईल असा एकूण सुमारे 21 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादी चंद्रकांत द्वारकानाथ पाटील (74, रा.प्लॉट नं. 11/2, काके वाडी, श्रीकृष्ण मंदिराजवळ, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह राहतात.
काय घडले जळगावात ?
शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजेपासून ते रविवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.45 वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या जिन्यातील दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादीच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेली 10 हजारांची रोकड तसेच त्यांच्या पत्नीच्या कपड्यांच्या पिशवीत ठेवलेली सहा हजारांची रोकड लांबवली. याशिवाय सुमारे पाच हजार रुपये किंमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 21 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. तपास हवालदार प्रमोद लाडवंजारी करीत आहेत.


