परीक्षेचा ताण दूर करा अन् एकाग्रतेचा मंत्र गिरवा ! भुसावळात अनिता कोटेचा

भुसावळ शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींना ‘आरोग्यदायी जीवन शैलीचे धडे’


भुसावळ (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : परीक्षेच्या काळात अभ्यासासोबतच विद्यार्थिनींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते. आहारातील योग्य संतुलन, पुरेशी झोप, मानसिक ताणाचे प्रभावी व्यवस्थापन आणि सकारात्मक जीवनशैली यांचा थेट परिणाम अभ्यासातील एकाग्रता व परीक्षेतील कामगिरीवर होतो. याच अनुषंगाने अनिता कोटेचा यांनी शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींना संतुलित आहार, पोषणमूल्ये, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले.

मानसिक तणावावर मिळवा नियंत्रण
माजी विद्यार्थिनी संघटनेतर्फे विद्यार्थिनींसाठी ‘स्वस्थ शरीर, शांत मन आणि सफल परीक्षा’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोटेचा यांनी परीक्षेच्या काळात कोणता आहार घ्यावा, मानसिक ताणावर नियंत्रण कसे मिळवावे, अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी आणि मन शांत ठेवण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे ध्यानधारणा व एकाग्रता वाढविण्याची विविध तंत्रे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगत विद्यार्थिनींना त्याचा अनुभवही दिला. व्याख्यानानंतर विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मीना चौधरी होत्या. सूत्रसंचालन डॉ.राजकुवर गजरे यांनी तर आभार प्रा.दीपाली पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ.जे.व्ही.धनवीज यांचे तांत्रिक सहाय्य लाभले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !