वारली चित्रकलेतून ग्रामीण कलेचे व संस्कृतीचे दर्शन : रजनी सावकारे

भुसावळात वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिर समारोप


भुसावळ (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : वारली चित्रककेतून ग्रामीण कलेचे व संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडते. आजच्या काळात, अशी शिबिरे होणे गरजेचे असून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच मोबाईलमध्ये अडकल्याचे दृश्य आपण पाहतो मात्र अशा शिबिरांना वेळ दिल्याने आपल्याला आदिवासी वारली चित्रशैली आणि त्यांची परंपरा त्यांच्याच कलेतून अभ्यासण्याची संधी मिळते, असे विचार भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकाने यांनी येथे व्यक्त केले. वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या

शिबिराचा समारोप
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने भुसावळात 1 ते 5 ऑक्टोबर 2026 या दरम्यान ब्राह्मण संघात वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिर झाले. सोमवारी या शिबिराचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी रजनी सावकारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, सचिव महेंद्र गोडबोले, रागिणी संगीत कला महाविद्यालय, बर्‍हाणपूरचे प्राचार्य डॉ.सतीश वर्मा, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे कार्यक्रम अधिकारी विवेक श्रीरामे उपस्थित होते.

सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप
प्रास्ताविकात शिबिराचे मार्गदर्शक रमाकांत भालेराव यांनी प्रशिक्षण शिबिरात शिकवलेल्या सर्व माहितीवर प्रकाश टाकला. शिबिरात मदत केलेल्या भास्कर नारखेडे आणि राजेश्री देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. अनिल पाटील, जळगाव व रेवती मांडे यांनी त्यांचे शिबिराबद्दल मनोगत व्यक्त करून, असे शिबिर ठराविक काळाने नियमित घ्यावे असे विचार मांडले. यावेळी सर्व शिबिरार्थी यांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी वारली चित्रकार रमाकांत भालेराव यांच्या चित्रांचे प्रदर्शन शिबिरार्थींच्या अवलोकनार्थ आयोजित करण्यात आले होते. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी चारू भालेराव, हेमांगी पडागरे , श्रीकांत पवार, नुपूर भालेराव, अशोक पाटील, माहूरकर, भास्कर. नारखेडे, सोनल भिरुड यांनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !