निंभोरा फाट्याजवळ गुटखा वाहून नेणार्‍या कारला अपघात : दोघे जखमी

बर्‍हाणपूरकडे कार चोपड्याकडे जात असताना अपघात : दोघांविरोधात गुन्हा


रावेर (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथून गुटखा घेवून चोपड्याकडे निघालेल्या कारला निंभोरा फाट्याजवळ अपघात घडला. या अपघातात वाहनातील दोन जण जखमी झाले आहेत. या वाहनात गुटखा असल्याने या अपघाताने खळबळ उडाली. रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कायय आहे प्रकरण ?
सूत्रांच्या माहितीनुसार, कार (एम.एच.26 व्ही.4423) हे वाहन मध्यप्रदेशातून गुटखा घेवून रावेरमार्गे चोपड्याकडे जात असताना निंभोरा फाट्याजवळ या वाहनाला बुधवारी अपघात झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहनातील दोघांना बाहेर काढले. अपघाताची माहिती रावेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शरद राजपूत यांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोघांना प्रथम सावदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आढळून आला तर निंभोरा पोलिसांनी धाव घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिल्यानंतर सायंकाळी अधिकार्‍यांनी वाहनातील गुटख्याची मोजणी करीत रात्री उशिरा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केल्याचे सूत्रांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !