भुसावळातील भोळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
भुसावळ (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धन व आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धैर्यसागर राणे, तसेच डॉ. रेश्मा जावळे आणि डॉ. प्रिया बराटे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर.पी. फालक सरांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिबिराच्या आयोजनासाठी संबंधित समिती , प्रा डॉ.माधुरी पाटील,प्रा. डॉ.अनिल सावळे,प्रा. डॉ जगदीश चव्हाण,प्रा. डॉ अंजली पाटील,प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा डॉ आर.बी.ढाके,प्रा. डॉ.संजय चौधरी,प्रा. निर्मला वानखेडे,प्रा.सागर सोनावणे,प्रा अजय साळुंखे,प्रा. खिलचंद धांडे व प्रकाश चौधरी, सुनिल ठोसर,सुधाकर चौधरी यांचे सहकार्य लाभले.


