शेतातील विद्युत मोटर चोरीचा पर्दाफाश ; रमजीपूरातील चौकडी रावेर पोलिसांच्या जाळ्यात

चोरीचे विद्युत पंप विक्रीसाठी येताच पडल्या बेड्या :चोर्‍या उघडकीस येणार


रावेर (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : शेतातील विद्युत मोटर व मोटरपंप चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रावेर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत गोपनीय माहितीच्या आधारे रमजीपूर येथील चोरट्यांच्या चौकडीला बेड्या ठोकल्या. आरोपींच्या अटकेनंतर शेत-शिवारातील पंप चोरीच्या घटनांची उकल होण्यास मदत होणार आहे.

चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
रमजीपूरचे शेतकरी मोहन लालचंद कावडकर यांच्या शेतातील गट क्रमांक 1622/2 मधून पाच एच.पी. क्षमतेची समुराई कंपनीची पाण्याची मोटर अज्ञात चोरट्याने 3 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री चोरून नेल्याने रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोरीच्या मोटर, कॉपर वायर आदींबाबत विशेष तपास सुरू असतानाच तपास पथकाला काही संशयीत चोरीचे पंप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने संशयीत राजेंद्र सुधाकर महाजन (30), उमेश प्रकाश धनगर (23), रितेश जगन्नाथ कावडकर (23), आनंदा गोपाळ धनगर (28, सर्व रा.रामजीपूर) यांना अक केली. आरोपींनी पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी विद्युत मोटरपंप चोरीची कबुली देत मुद्देमाल काढून दिला. आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, त्यांच्यासोबत आणखी कोण साथीदार आहेत तसेच चोरीचा मुद्देमाल त्यांनी कोणाला विकला आहे का? याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहा.निरीक्षक अमूल बच्छाव, हवालदार सिकंदर तडवी, योगेश पाटील, गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास अंमलदार सिकंदर तडवी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !