जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यातील 65 कोटींच्या अंमली पदार्थांचा नाश

46.15 ग्रॅम एम्फेटामाईनसह मेथाक्वालोन रांजणगाव एमआयडीसीत नष्ट


जळगाव (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : जळगाव जिल्हा पोलीस दलाने दोन गुन्ह्यात जप्त केलेला 65 कोटी 70 लाख रुपये किंमतीचे 46.15 ग्रॅम वजनाचे एम्फेटामाईन आणि मेथाक्वालोन हे अंमली पदार्थ पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी एमआयडीतील कायदेशीर प्रक्रियेअंती करण्यात आले. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. या प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

रांजणगाव एमआयडीसीत अंमली पदार्थांचा नाश
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., प्लॉट क्र. 56, एमआयडीसी रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे महाराष्ट्र पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ नष्ट केले जातात. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. ही रांजणगाव एमआयडीसी येथील घातक कचर्‍यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याची सुविधा असलेली कंपनी आहे. अशा प्रकारच्या अधिकृत सुविधेचा वापर जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा पर्यावरणपूरक व नियमानुसार नाश करण्यासाठी केला जातो.

दोन गुन्ह्यातील मुद्देमालाचा नाश
पोलिसांच्या माहितीनुसार, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 43.267 ग्रॅम एम्फेटामाइन तर भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत 895 ग्रॅम मेथाक्वालोन जप्त करण्यात आले होते. दोन्ही अंमली पदार्थांची किंमत 65 कोटी 70 लाख रुपये असून गुरुवार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री अंमली पदार्थांच्या नाशासाठी प्रस्ताव जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीसमोर सादर करण्यात आला. समितीने तपासणी करून मुद्देमाल नष्ट करण्यास मान्यता दिल्यानंतर पथकाने अंमली पदार्थ महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., प्लॉट क्र. 56, एमआयडीसी रांजणगाव येथे नष्ट केला. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रक्रिया
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय गायकरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकरवाड तसेच वजन-मापे निरीक्षक गौतम उत्तम बाविस्कर आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !