रावेरातील भगवती नगरात घरफोडी : 65 हजारांचा ऐवज चोरीला


रावेर (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : रावेर शहरातील भगवती नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.रावेरातील महेंद्र गोपाळ पाटील (39, मूळ रा. मोरगाव बु., ता. रावेर, हल्ली मुक्काम भगवती नगर, रावेर, जि.जळगाव) हे चहा पावडर विक्री करून उदरनिर्वाह करतात शहरातील भगवती नगरात त्यांचे घर असून
5 ऑक्टोबरच्या रात्री 12.30 वाजेपासून ते 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कॉटमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

65 हजारांचा ऐवज लंपास
चोरीस गेलेल्या मुद्देमालात 15 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके आणि 50 हजारांची रोकडचा समावेश आहे. एकूण 65 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर सपकाळे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !