भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयातील खेळाडूंचा आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग महिला स्पर्धेत डंका


भुसावळ (शनिवार, 7 ऑक्टोबर 2026) : जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात झाल्या. त्यात शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. स्पर्धेत तरुन्नुम पिंजारी (45 ते 48 किलोगट) व माया राजपूत (80 + किलो ग्राम) विजयी ठरल्या.

यशस्वी खेळाडूंचा महाविद्यालयातर्फे गौरव
यशस्वी खेळाडूंचा प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार केला. यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जयश्री भंगाळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण यांनी गौरव केला. यशस्वी खेळाडू यांची कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर विभागीय. बॉक्सिंग स्पर्धा धरणगावसाठी निवड झाली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !