भुसावळात जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत जिल्हाभरातील संघांनी केले उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन


भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.भुसावळ नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपमुख्याधिकारी शेख परवेज, बियाणी एज्युकेशन संस्थेचे विनोद बियाणी, वैभव पवार, अनिलकुमार आहुजा, दीपक अहिरे, प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, हिम्मत पाटील यांच्यासह विविध मान्यवर, क्रीडा शिक्षक, पंच आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळाकडे केवळ छंद म्हणून नव्हे, तर करिअर म्हणूनही पाहा : मंत्री  रक्षा खडसे
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की,हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो. विद्यार्थ्यांनी केवळ खेळ खेळणेच नव्हे, तर त्या खेळाचा इतिहास, नियम आणि महत्त्व यांचीही माहिती करून घेणे आवश्यक आहे. खेळाकडे केवळ मनोरंजन किंवा छंद म्हणून न पाहता, करिअर घडविण्याची संधी म्हणूनही पाहिले पाहिजे.

असा आहे जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेचे निकाल
14 वर्षांखालील मुले- प्रथम- अंजुमन उर्दू स्कूल, साकळी, ता.यावल, द्वितीय- बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ

14 वर्षांखालील मुली- प्रथम- बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ, द्वितीय- सेंट मेरी स्कूल, भुसावळ

17 वर्षांखालील मुले- प्रथम- एच.एस.डब्ल्यू स्कूल, भुसावळ, द्वितीय – एम.आय.तेली स्कूल, भुसावळ

17 वर्षांखालील मुली- प्रथम- डॉ.उल्हास पाटील गोदावरी स्कूल, भुसावळ, द्वितीय- एच.एस.डब्ल्यू.स्कूल, भुसावळ

19 वर्षांखालील मुले- प्रथम- अलहिरा स्कूल, भुसावळ, द्वितीय- बी. झेड स्कूल, भुसावळ

19 वर्षांखालील मुली- प्रथम- अलहिरा स्कूल, भुसावळ, द्वितीय- बी. झेड स्कूल, भुसावळ

क्रीडा शिक्षक व पंचांचे योगदान
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथील व्यवस्थापन, सर्व क्रीडा शिक्षक, पंच आणि सहकार्य करणार्‍या व्यक्तींचे मोलाचे योगदान लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !