भुसावळात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे श्री अग्रसेन जयंती उत्साहात


भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : शहरातील भगवान श्री अग्रसेन महाराजांची जयंती श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे रविवारी सकाळी साडेसहा वाजता जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज जवळील अग्रसेन चौकातील प्रतिमेला पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात ही फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी शेकडो बंधू-भगिनी उपस्थित होत्या. उद्योगपती मिलिंद अग्रवाल, कर सल्लागार देवेंद्र अग्रवाल, जयप्रकाश अग्रवाल, मोंटू अग्रवाल, बद्रीनारायण अग्रवाल, संजय अग्रवाल, सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेश अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, बिणा अग्रवाल, नेहा अग्रवाल, डॉ.रिया अग्रवाल या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल-श्रीफळ देऊन विशेष सत्कार व स्वागत राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व सहकारी यांच्यातर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन जे.आर.शर्मा तर आभार संजय अग्रवाल यांनी मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !