कोसगावातून उपद्रव निर्माण करणार्‍या माकडाला पकडले


यावल (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील कोसगावात माकडांच्या धुमाकुळामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. माकडाच्या चाव्याने एका महिलेचा मृत्यू होताच वनविभागाने पिंजरा लावताच एका माकडाला जेरबंद करण्यात आले.

वनविभागाने लावले पिंजरा
गत पंधरा दिवसांपूर्वी माकडाने कौशल्याबाई साहेबराव पाटील यांच्या अंगावर उडी घेतल्याने त्या जबर जखमी झाल्या होत्या. पंधरा दिवस खाजगी दवाखान्यांमध्ये औषधोपचार सुरू असताना संभाजीनगरातील एका दवाखान्यांमध्ये त्यांचे निधन झाले होते. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे माकड पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली होती. अरुण साहेबराव पाटील, सुनील पाटील यांनी वन विभागाचे पूर्वचे रेंजर स्वप्निल फटांगरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पिंजरे लावण्याची मागणी केली होती.


वनविभागाकडून फैजपूर वनविभागाच्या डेपोकडून ज्योती धनगर वनपाल फैजपूर व राउंड स्टाफ जीवन नागरगोजे वनरक्षक, मनिष बारेला वनरक्षक, नानसिंग बारेला वनरक्षक, इंद्रकुमार लखवादे वनरक्षक, अनिल बारेला वनरक्षक यांनी कोसगाव गाठले. साहेबराव पुंडलिक पाटील यांच्या घराजवळ माकड येत असल्याने त्या ठिकाणाहून पिंजरा लावून एका माकडास जेरबंद केले. गावात अजुन पिंजरा ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !