यावल बसस्थानकावरून महिलेसह दोन बालकांचे अपहरण
यावल (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : यावल शहरातील बस स्थानकावर 35 वर्षीय महिला आपल्या सोबत दहा वर्षीय मुलगी आणि सात वर्षीय मुलगा यांना घेऊन प्रवासासाठी आली असता बस स्थानकावरून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर महिलेचे आणि या मुलांचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले यावल शहरात ?
यावल शहरातील बस स्थानकावर प्रमिला कैलास बागुल (35) ही महिला मुलगी पूनम बागुल (10) व मुलगा आर्यन बागुल (7, तिघे राहणार चहार्डी, ता.चोपडा) हे तिघे प्रवासासाठी आले होते. बस स्थानकावरून महिला आणि या दोघं बालकांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेत अपहरण केल्याची तक्रार विनोद भालेराव रा. (हिगोणा) यांनी दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहे





