भुसावळात दाम्पत्याला मारहाण : एकाविरोधात गुन्हा
भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : दुकानाचे फोटो काढल्याच्या संशयातून शहरातील दाम्पत्यास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बापू भास्कर जंगलेविरुद्ध विविध कलमांन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
शहरातील श्रद्धा नगर, माऊली प्लाझा परिसरातील रहिवासी व बातमीदार प्रमोद पाटील हे शनिवारी दुपारी एक वाजता घरी असताना संशयीत बापू भास्कर जंगले (रा.तापी पब्लिक स्कूल जवळ, भुसावळ) याने दुकानाचे फोटो काढल्याच्या संशयातून पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. संशयीताने घरातील फिश टँक फोडून तोडफोड केल्याचे तसेच जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जुबेर तडवी करीत आहेत.





