नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; शेतकर्‍यांचे पशूधन चोरणारे दोघे जाळ्यात, सात गुन्ह्यांची उकल

वाहनांसह आठ लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त ; आरोपींच्या साथीदारांचा कसून शोध


नंदुरबार (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : शेतकर्‍यांचे पशुधन चोरून त्याची विक्री करणार्‍या टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईने शहादा, सारंगखेडा आणि तळोदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पशुधन चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे महेबूब युसुफ कुरेशी (25) व हाशीम पिरबक्ष मक्राणी (31, मक्राणी फळी, अक्कलकुवा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना पशूधन चोरणार्‍या चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. 20 रोजी संशयीत पिकअप (एम.एच.48 ए.जी.8657) ने नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात संशयित वाहनांचा माग काढत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले तर वाहनाच्या तपासणीत दुचाकी (एम.एच.39 ए.टी.3673) आढळल्याने आरोपींनी वाहनाद्वारे गुरे चोरीपूर्वी रेकी करण्यासाठी तिचा वापर केला जात असल्याची कबुली देत चोरी केलेल्या पशूधनाची विक्री करीत त्यातील पैशांचे आपसात वाटप करून घेतल्याचे सांगितले.





सात गुन्ह्यांची उकल
आरोपींच्या चौकशीत त्यांनी गेल्या चार महिन्यात शहादा पोलीस ठाण्यातील पाच, सारंगखेडा पोलीस ठाण्यातील एक आणि तळोदा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हवालदार दत्तात्रय बागल, स्वप्नील गोसावी, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, शोएब शेख, भरत उगले, मनोज महाजन, राहुल पांढारकर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !